नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाडीबीटी शेतकरी योजना या पोर्टल MahaDBT Subsidy List द्वारे महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांकडून महाडीबीटी पोर्टलवर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत तुषार संच आणि ठिबक संच यासाठी अर्ज मागविले जातात.
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर तुषार संच आणि
ठिबक संच यासाठी अर्ज केल्यानंतर लाभार्थ्याची पोर्टल द्वारे ऑनलाईन पद्धतीने सोडत
यादी प्रसिद्ध केली जाते आणि या सोडत यादीमध्ये लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर त्या
लाभार्थ्याला निवड झालेल्या घटक साठी आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड
करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात.
ऑनलाइन सोडत मध्ये निवड झाल्यानंतर लाभार्थ्याला
निवड झालेल्या दिवसापासून पुढील दहा दिवसांमध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे
बंधनकारक आहे अन्यथा त्याला भारताचा तो निवड झालेला अर्ज रद्द करण्यात येतो.
कागदपत्रे पोर्टल वर अपलोड केल्यानंतर अपलोड
केलेल्या कागदपत्रांची ऑनलाइन पद्धतीने छाननी केली जाते आणि त्यानंतर त्याला परत
त्याला तू घटक खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती दिले जाते.
पूर्वसंमती मिळाल्यानंतर लाभार्थ्याला निवड झालेला
घटक किंवा बाब खरेदी करून त्या घटकाचे खरेदी बिल हे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड
करावी लागते.
खरेदी बिल पोर्टलवर अपलोड केल्यानंतर आपल्या
घटकाची मोका तपासणी केली जाते आणि त्यानंतर आपला प्रस्ताव हा अनुदान अदा
करण्यासाठी पाठविल्या जातो.
तर आज एप्रिल 2023 महिन्याअखेर
महाडीबीटी तुषार आणि ठिबक संच अर्जाची स्थिती आपण खालील दिलेल्या यादीमध्ये पाहू
शकता.
खाली दिलेल्या यादीमध्ये लाभार्थी शेतकरी हे आपला
अर्ज कोणत्या स्टेजवर आहे ते तपासून शकतात यामध्ये आपला अर्ज पेमेंट प्रक्रियेत
असू शकतो किंवा आपल्या अर्जाचे पेमेंट झालेले असू शकते म्हणजेच अनुदान वितरित केलेले
असू शकते ही सविस्तर माहिती आपण खालील दिलेल्या अनुदान यादी मध्ये पाहू शकता.
एप्रिल 2023 महिन्याअखेर महाडीबीटी तुषार आणि ठिबक अनुदान यादी पाहण्यसाठी खालील लिंक वरती भेट द्या :
येथे क्लिक करून अधिक माहिती साठी आमच्या
अधिक वाचा :
* पोकरा योजना
महत्वाची बातमी ...लवकर ही कामे करा
* महाडीबीटी
अनुदान जमा झाले का? येथे पहा...